जीवनसत्त्वे – स्त्रोत व कार्ये

जीवनसत्त्वे – स्त्रोत व कार्ये 


1.जीवनसत्त्व – A
  • कार्ये – डोळ्यांचे रक्षण; त्वचा, दात, हाडे निरोगी राखणे.
  • स्त्रोत – गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या.
  • अभावजन्य विकार – रातांधळेपणा (कमी उजेडात पाहू न शकणे, अंधत्व) ,झीरोडर्मा (त्वचा कोरडी पडणे)
2.जीवनसत्त्व – B1
  • कार्ये – चेतातंतूंचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे.
  • स्त्रोत – दूध, मासे, मांस, तृणधान्ये, कवचफळे, डाळी
  • अभावजन्य विकार – बेरीबेरी (चेतातंतुंचा आजार), स्नायूंचा अशक्तपणा/ अकार्यक्षमता
3.जीवनसत्त्व – B9
  • कार्ये – शरीराची वाढ
  • स्त्रोत – गडद हिरव्या भाज्या, पपई, कीवी
  • अभावजन्य विकार – वाढ नीट न होणे, ॲनिमिया, विसर पडणे, हालचाली मंदावणे.
4.जीवनसत्त्व – B12
  • कार्ये – लाल रक्तपेशी तयार करणे.
  • स्त्रोत – दुग्धजन्य पदार्थ, मांस
  • अभावजन्य विकार – ॲनिमिया
5.जीवनसत्त्व – C
  • कार्ये – शरीराच्या उतींचे रक्षण करणे, हिरड्या, दात ,हाडे ,त्वचा यांसाठी आवश्यक असे कॉलेजन हे प्रथिन तयार करणे.
  • स्त्रोत – आवळा, कीवी, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या.
  • अभावजन्य विकार – स्कर्वी (हिरड्यांमधून रक्तस्राव होणे) ,गलग्रंथी सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे.
6.जीवनसत्त्व – D
  • कार्ये – दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शिअम व फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे.
  • स्त्रोत – सूर्यप्रकाशामुळे दूध, मासे, अंडी, लोणी यांतील काही पदार्थांपासून शरीरात हे जीवनसत्त्व तयार होते.
  • अभावजन्य विकार – मुडदूस (हाडे मऊ होणे, त्यामुळे वेदना होणे, हाड मोडणे)

7.जीवनसत्त्व – E
  • कार्ये – पेशींमध्ये छायाचय क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे. 
  • स्त्रोत – तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोवळी पालवी ,वनस्पतीजन्य तेल.
  • अभावजन्य विकार – स्नायूमध्ये कमकुवतपणा येणे, प्रोजेक्टपादनामध्ये अडथळा निर्माण होणे, त्वचाविकार.

8.जीवनसत्त्व – K
  • कार्ये – रक्त साकळण्यास मदत होणे. 
  • स्त्रोत – हिरव्या पालेभाज्या ,ब्रोकोली ,हिरवी कोबी ,मोड आलेली कडधान्य, अंड्याचा पिवळा भाग.
  • अभावजन्य विकार – इजा झाल्यास फार रक्तस्त्राव होणे.